तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे अनेक रस्ते अतिक्रमण मुक्त झाले मात्र मंगळवार दिनांक 26 रोजी पावणारा गणपती किसान चौकात राबविण्यात येत आलेले अतिक्रमण हटाव मोहिम तात्पुरती ठरली.

मंगळवार दि 26 रोजी सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी अतिक्रमण हटाव पथकाने पावणारा गणपती चौक ते राजे शहाजी महाद्वार या रस्त्यावर असणाऱ्या  पावणारा गणपती  किसान चौकातील रस्त्यावर  असणारे अतिक्रमण हठविण्यात आले त्याचे फोटो सेशन होताच अवघ्या दहा मिनिटानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण झाल्याने अतिक्रमण मोहिमेचे पुढे पाठ माग सपाट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुळजापूर शहरात भवानी रोड, महाद्वार रोड, श्री तुळजाभवानी मंदिराकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमे जबरदस्त राबवण्यात आली. याचा परिणाम भवानी रोड महाद्वार रोड वरील अतिक्रमणे हटवल्याने या रस्त्यावरून भाविकांना येजा करणे सुलभ झाले.

शुक्रवार पेठ, पाण्याची टाकी, बोंबल्या चौक ते पावणारा गणपती, राजे शहाजी महाद्वार या रस्त्यावर ही भाविकांचे प्रचंड ये-जा असून, या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पावणारा गणपती मंदीर, किसान चौकातील अतिक्रमण हटविण्यात आले. सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी अतिक्रमण काढून कर्मचाऱ्यांनी फोटो काढला. कर्मचाऱ्याने अधिक्रमण काढून झाल्यावर पुढच्या दहा मिनिटात परत हाय तशी  परिस्थिती अतिक्रमणाची झाली. अतिक्रमण पथक जातात पुन्हा त्याच रस्त्यावर अतिक्रमणधारकाने अतिक्रमण केले. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती ठरली. ही अतिक्रमण हटाव मोहीम शहरात दिवसभर चर्चेचा विषय ठरली होती.


 
Top