धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संमेलनाचे निमंत्रक डॉ.शरद गोरे यांनी दिली,29,30 मे 2026 रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये हे संमेलन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. आमदार कैलास पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष भूषवत आहेत.
देशभरातून 900 साहित्यिक या संमेलनास हजेरी लावणार आहेत,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय सचिव सुवर्णा पवार,राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर,कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,संमेलनाच्या विचारपीठाला ख्यातनाम ग्रामीण साहित्यिक कै.प्रा.भास्कर चंदनशिव यांचे तर संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारास संत गोरोबा काका यांचे नाव देण्यात आले आहे,महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार हे डॉ.शरद गोरे यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन हि या प्रसंगी होणार आहे,या ग्रंथात देशभरातील 156 कवींनी आपल्या काव्यातून दादांना आदारांजली वाहिली आहे,मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे झुंजार सेनानी ( तुकाराम गंगावणे) राजकारण,पुढारी,( किशोर टिळेकर) कबीरांचे दोहे ( सुर्यकांत नामगुडे) विश्वकवी उन्मेष शेकडे ( प्रा.नंदकुमार बालुरे ) आदी ग्रंथांचे हि प्रकाशन होणार आहे, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांचा मराठी भाषा संवर्धनासाठी विशेष सन्मान केला जाणार आहे,मराठी ग्रामीण साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी प्रा.भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर साहित्य जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे 51 हजार रुपये रोख मानपत्र,स्मृतिचिन्ह,शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे, तर सुप्रसिद्ध साहित्यिक किशोर टिळेकर ( पुणे) यांना संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, साक्षी जमादार ( उमरगा) यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय युवा साहित्यरत्न पुरस्कार,दत्तात्रय भोंगळे ( सासवड) यांना तानूबाई बिर्जे राज्यस्तरीय पत्रकाररत्न जीवन गौरव पुरस्कार तर विनोद राऊत (मुंबई )गणेश मोरे ( मुंबई) यांना तानूबाई बिर्जे राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे,
29 मे ला सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ग्रंथदिंडीस सुरुवात होणार आहे,त्याचे उद्घाटन साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त गुरू भांगे करणार आहेत,सकाळी 11 वाजता उद्घाटन सोहळा होणार असून त्यानंतर दुपारी 2 वाजता महिला वरील अत्याचाराला जबाबदार कोण हा परिसंवाद ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. वक्ते म्हणून खासदार डॉ.ज्योती वाघमारे,प्रा.जगदीश गवळी सहभागी होणार आहेत,दुपारी 2:45 मिनिटांनी डॉ.बंडोपंत पाटील (सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन तर दुपारी 4 वाजता पत्रकार विनोद राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समाज माध्यमं किती तारक किती मारक हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये गणेश मोरे ( पत्रकार) दिलीप कापसे (साहित्यिक) हे वक्ते म्हणून सहभाग नोंदवणार आहेत. 4:45 वाजता प्रा.डॉ.मनिषा नाडगौडा (बेळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन तर सायंकाळी 6 वाजता नवनाथ गायकर (इगतपुरी) यांच्या अध्यक्ष असणाऱ्या कथाकथनाच्या सत्रात बाळासाहेब देशमुख (अहिल्यानगर) संतोष चव्हाण (माढा) हे कथाकार सहभाग घेणार आहेत. संध्याकाळी 6:40 वाजता लीलादेवी पाटील (चाळीसगाव) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन,
संध्याकाळी 7:40 वाजता डॉ.शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली खुले चर्चासत्र होणार असून डॉ.अश्विनी भगत (केरळ) छाया पुसेकर (गोवा) युवराज नळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. 30 मे रोजी सकाळी 7:30 वाजता
मीना महामुनी (धाराशिव), सुनिता वाळुंज (सिन्नर), राजश्री बोहरा (डोंबिवली), सुर्यकांत नामुगडे (पुणे), प्रतिभा मगर (पुणे), भाग्यश्री केसकर (धाराशिव), तुकाराम गंगावणे (परंडा), मधुकर गिलबिले (राजगुरूनगर), डॉ.आकाश वानखेडे (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनं होणार आहेत. तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दिलीप अलोणे (यवतमाळ) यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाचे मूल्य व बाजारीकरण हा परिसंवाद हि होणार आहे. प्रा.मिलिंद रंगारी (गोंदिया) यांच्या अध्यक्षतेखाली बोलीभाषेची गळचेपी होते आहे का हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये डॉ.शैला जगदंबे (संभाजीनगर), प्रा.राजा जगताप (धाराशिव) तर संध्याकाळी 5 वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पालकर व मराठवाडा उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे हे संमेलनाचे मुख्य संयोजक आहेत.
