धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे सालाबादाप्रमाणे यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेत 121 विदयार्थी पात्र ठरले असून हे देदिप्यमान यश प्रशालेने प्राप्त केले आहे .
इयत्ता आठवी स्कॉलरशिप मध्ये 200 पेक्षा अधिक गुण घेणारे 29 तर पाचवीत 9 विद्यार्थी आहेत. आठवीतून मयुरेश स्वामी 270 गुण घेऊन प्रथम आला. तर 262 गुण घेऊन द्वितीय क्रमांक सावंत सिद्धी हिने पटकावला. तर तृतीय क्रमांकावर दळवे अक्षरा व थिटे सत्यम यांनी 260 गुण घेतले. तर चौथ्या स्थानावर असलेल्या अर्पिता मुळे हिने 258 गुण घेतले. तर पाचव्या स्थानावर असलेल्या मनस्वी इंगळे हिने 246 गुण प्राप्त केले. इयत्ता पाचवीमध्ये प्रथम क्रमांकावर आरोही अर्जुने हिने 276 गुण घेतले. तर द्वितीय क्रमांकावर वाघमारे परिक्षित 252 गुण, तर तृतीय क्रमांकावर देशमुख समरजित 230 गुण, चौथ्या स्थानावर शिंदे आयुष याला 224 गुण, तर पाचव्या स्थानावर असलेला कवडे श्रीतेज 222 गुण प्राप्त झाले.
या घवघवीत यथाबद्दल आदर्श आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील,सचिव प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे,उप मुख्याध्यापक यशवंत इंगळे तसेच पर्यवेक्षक तथा स्कॉलरशिप विभाग प्रमुख कुमार निकम, राजेंद्र जाधव, श्रीमती बी. बी. गुंड, प्रवीण बागल, शेषनाथ वाघ, बालाजी गोरे, डॉ.विनोद आंबेवाडीकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व संबंधित स्कॉलरशिपचे विषय शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे व पाचवी स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख आर. बी.चौधरी यांचे अभिनंदन केले.
