धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची वाढती मागणी लक्षात घेता तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाने नुकतीच ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन मुलांमध्ये उत्साह जागृत केला. 

सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून मुलांना भरघोस पॅकेजच्या ऑफर दिल्या जातात. परंतु केवळ अभियांत्रिकी मधील पदवी यासाठी उपयोगी नसून विद्यार्थ्यांमधील ज्ञान आणि कौशल्य अशावेळी आजमावली जातात. हीच गोष्ट लक्षात घेऊन येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने नव नवीन कौशल्यावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केले होते. नामांकित कंपन्यांच्या प्लेसमेंट स्पर्धेत टिकण्यासाठी त्या धरतीवरच  ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन प्रिप्लेसमेंट ट्रेनिंग ही विद्यार्थ्यांना देण्यात आली. 

या टेस्टमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने व अकॅडमीक डीन व मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते, प्रा. रणजीत दंडनाईक व प्रा. वैभव जगदाळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.  अशा प्रकारे भरतीपूर्व प्रशिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत झाल्याचे विद्यार्थ्यांनी याप्रसंगी बोलून दाखविले.

 
Top