मुरूम (प्रतिनिधी)- स्व. माधवराव उर्फ काका पाटील यांनी उमरगा-लोहारा तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला जोखून देऊन मोठ्या मेहनतीने उभी केलेली साखर कारखानदारी, शिक्षणसंस्था या भागातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक राबविलेल्या जलसिंचनाच्या लहान-मोठ्या पाणी योजना, बेनीतुरा मध्यम प्रकल्पाची उभारणी त्यातून झालेला कृषी, सहकार व औद्योगिक विकास. दरम्यान या परिसरात कुठलाही साखर कारखाना नसल्याने काकांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे हाल व  खाजगी साखर कारखानदार यांच्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सहकारी तत्वावरील मुरूमच्या माळरानावर श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला पाहिजे. म्हणून साखर उद्योग उभारण्याचे ठरवून विकासाची पहिली मुहूर्तमेढ सन 1994 साली विठ्ठलसाईच्या रूपाने रोवली गेली. साखर कारखान्याच्या अगोदर काकांनी सन 1970 मध्ये नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम या शिक्षण संस्थेचा पाया रचला. पुढे त्यांचे जेष्ठ चिरंजीव माजी राज्यमंत्री बसवराज पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी त्यावर कळस चढविला. तसेच युवा नेते जनता सहकारी बॅकेचे चेअरमन शरण पाटील हे वडीलांचा व काकांचा आदर्श घेऊन पुढे त्यांच्या विचारसरणीनुसार कार्यतत्पर राहून वाटचाल करीत आहेत. प्रारंभी स्व. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास बुधवारी (ता.20) रोजी बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कै. माधवराव पाटील यांच्या 24 व्या पुण्यतिथीचे  औचित्य साधून माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व श्री माधवराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बापूराव पाटील, व्हाईस चेअरमन ॲड. व्ही. एस. आळंगे, विठ्ठल साई कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, माणिक राठोड, श्रमजीवी शिक्षण संस्थेचे संचालक  मल्लिनाथ दंडगे, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, ॲड. संजय बिराजदार, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, मदन पाटील, रशीद शेख, धनराज पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्राचार्य डॉ. महेश्वर  होगाडे, डॉ. राम सोलंकर, उल्हास घुरघरे, सलीम जमादार आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. रक्तदान शिबिरामध्ये उपप्राचार्य योगेश पाटील, सुदीप ढंगे, प्रा. हर्षद बदोले, प्रा. प्रियंका काजळे, वैष्णवी पाटील, मल्लू स्वामी, श्रीकृष्ण रक्त संकलन केंद्र, गुंजोटीचे सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन विद्यालय, मुरुम तसेच विठलसाई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.  

 
Top