धाराशिव (प्रतिनिधी)-  विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 (उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ) चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तीन जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. 

निवडणूकीची अधिसूचना 25 मे 2026 (सोमवार) रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेर दिनांक  1 जून 2026 (सोमवार), नामनिर्देशन पत्राची छाननी 2 जून 2026 (मंगळवार),उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 4 जून 2026 (गुरुवार), मतदानाचा दिनांक 18 जून 2026 (गुरुवार),मतदानाची वेळ सकाळी 4 ते दुपारी 4 वाजता, मतमोजणीचा दिनांक 22 जून 2026 (सोमवार),निवडणूक प्रकिया पूर्ण करण्याचा दिनांक 25 जून 2026 (गुरुवार) हा आहे. वरील प्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 (उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघ) च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.


 
Top