धाराशिव (प्रतिनिधी)- अधिक मासानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाकडून दि.१७ मे २०२६ ते दि. १५ जून २०२६ या कालावधीत धार्मिक स्थळांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.अधिक मास महिलांसाठी खास या उपक्रमांतर्गत महिला,ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक,अंध,दिव्यांग तसेच इतर प्रवाशांसाठी विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कार्यालयाने दिली आहे.
धाराशिव विभागातील धाराशिव, उमरगा,भूम,तुळजापूर,कळंब आणि परंडा आगारांमधून या विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.पुरुषोत्तम पुरी,अष्टविनायक,साडेतीन शक्तीपीठ,तुळजापूर- अक्कलकोट- पंढरपूर तसेच कोल्हापूर- जोतिबा- आदमापूर आदी धार्मिक स्थळांसाठी या बसेसची सुविधा उपलब्ध राहणार आहे.महिला व इतर प्रवाशांचा ४० जणांचा गट उपलब्ध झाल्यास विशेष बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार इतर धार्मिक स्थळांसाठीही बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित आगार प्रमुख व स्थानक प्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धाराशिव आगारासाठी आगार प्रमुख प्र.आ.भोंडवे (मो.९६३७१११७६५) व स्थानक प्रमुख प्र.वि.कुलकर्णी (मो. ७५८८१९१२१६),उमरगा आगारासाठी मु.रा.कोमटवार (मो. ७३८५१८९०७१),तुळजापूर आगारासाठी उ.य.शिनगारे (मो. ८६६८६०१०६०) व अ.स. बिराजदार (मो. ७७९६३६९८९७), भूम आगारासाठी रा.अ.शिंदे (मो. ९७६३०३२३९४) व नि.दा.चौरे, कळंब आगारासाठी श्री.शं.सुरवसे (मो. ७५८८११८८९८),परंडा आगारासाठी वि.शि.घोलप (मो. ९८६०४५००४३) व अ.अ.कवडे (मो. ८९७५९६७८८१) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.तसेच बा.ह.मुळे (मो.९२८४७८२५६५) व प्रि.भु.गंगावणे (मो.८६६८४७२९३६) यांच्याकडेही अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
