धाराशिव (प्रतिनिधी)- गावगाडा कला व साहित्य तर्फे दिला जाणारा पंचवार्षिक पुरस्कार ताल - गंधर्व यावर्षी जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते हनुमंत फडतरे यांना प्रदान करण्यात आला गावगाडा म्हणजेच गावा गावातून शास्त्री संगीत प्रचार व प्रसार तसेच कला जोपासून अनेक गावोगावी केलेले कार्य याबाबत पुरस्कार दिला जातो.
हनुमंत फडतरे जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील साकत ( बु) असून तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य पं. आप्पासाहेब जळगावकरांचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत गाणसरस्वती किशोरीताई आमोणकर,मुकुल शिवपुत्र, पं. शौनक अभिषेकी पं. रघुनंदन पणशीकर पं. राहुल देशपांडे रोणू मुजुमदार पं. रूपक कुलकर्णी उस्ताद फैयाज हुसेन,उस्ताद उस्मान खान, अमर ओक,पं. श्रीकांत देशपांडे, अशा मातब्बर कला करा सोबत तबल्याची साथ केलेली आहे सुरेश फडतरे व हनुमंत फडतरे या दोघा बांधवांची जुगलबंदी खूप प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी सवाई गंधर्व हर वल्लभ शंकर लाल तानसेन अशा महोत्सवामध्ये वादन केलेले असून अनेक परदेश दौरे केलेले आहेत. शनिवार मंडळाच्या सदस्यांनी हनुमंत फडतरे यांना ताल - गंधर्व पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
