भूम (प्रतिनिधी)- भूम तालूक्यातील माणकेश्वर येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका फातेमा इरफान मुखेर यांना ऑस्ट्रेलियन कादंबरीकार रिचर्ड फ्लनॅगनचे साहित्य या विषया वरील प्रबंध डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाणे स्विकारून डॉ फातेमा मुखेर यांना (2025 26) 241- 51 या पत्राद्वारे पी एच्‌‍ डी पदवी प्रदान केली आहे.  त्यांना या काळात  डॉ  मेहरून्नीसा पठाण याचे मार्गदर्शन लाभले होते. 

फातेमा मुखेर सद्या बीड येथील मिल्लीया कॉलेज येथे इंग्रजी विषयाच्या अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे सचिव श्रीमती सबीया खान प्राचार्य डॉ इरफान सिद्दीकी डॉ फैसल चाऊस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पीएचडी काळात फातेमा मुखेर यांना त्यांच्या मातोश्री, पती, बंधू, यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे  त्यांनी  यावेळी बोलताना सांगीतले.

 
Top