धाराशिव (प्रतिनिधी)- युवासेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. युवकांना “मंद” म्हणणे हे संपूर्ण युवा वर्गाचा अपमान आहे. अशा वक्तव्यांविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
युवा शक्तीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रातील युवकांचा स्वाभिमान जपण्यासाठी युवासेना नेहमीच ठामपणे उभी राहील. आजच्या आंदोलनावेळी उपस्थित युवासेना लोकसभा संपर्क प्रमुख किरण गायकवाड, युवासेना धाराशिव-कळंब विधानसभा संपर्क प्रमुख अभिराम पाटील, युवासेना तुळजापूर विधानसभा संपर्क प्रमुख गणेश रोचकरी, युवासेना उमरगा विधानसभा संपर्क प्रमुख शरद पवार, धाराशिव युवासेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप, जिल्हा प्रमुख सचिन जाधव तसेच उपस्थित सर्व युवासेनेचे पदाधकारी आकाश कावळे, संतोष जगदाळे, ईश्वर शिंदे, महेश केदार आणि इतर सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले.
