तुळजापूर (प्रतिनिधी)-  ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टस्‌‍ अँड ड्रगिस्टस्‌‍ यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि 20 रोजी औषध दुकाने बंद आंदोलनाला तुळजापुरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला  ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी. जीएसआर 817, दि. 28 ऑगस्ट 2018 मागे घ्यावा.  कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवसायिक सवलतींवर बंदी घालावी. बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून देशाला वाचवावे. कोविड काळातील जीएसआर 220 (दि. 26 मार्च 2020) मागे घ्यावा. संघटनांनी बंदमुळे रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत हा लढा औषध व्यवसायाचे संरक्षण आणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. हे बंद आंदोलनात सचिव किरण हंगरगेकर यासह  पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते.  

 
Top