तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील जळके सायकल स्टोअर्स चे विजयकुमार जळके यांचे चि.स्वराज जळके ह्याने दहावी परीक्षेत 86% टक्के गुण मिळवून यश संपादन केले. या यशाबद्दल अभाविपचे पूर्व प्रांत उपाध्यक्ष गणेश जळके यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी सुरेश जळके, रमेश जळके, विजयकुमार जळके परिवारातील सदस्य उपस्थित होते. जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केल्याचे त्यांच्या शिक्षकांनी सांगितले. या यशाबद्दल अनेकांनी कौतुक केले.
