भूम (प्रतिनिधी)- पश्चिम बंगाल सह तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेसाठी यश मिळाल्याचा आनंद तालुका भाजपच्या वतीने शहराच्या गोलाई चौकात साजरा केला.  यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

सोमवार 4 मे 2026 रोजी देशातील लक्ष वेधून घेतलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुददचेरी या पाच राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाकडे लक्ष वेधलं होते. निकालांती पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापण्यासाठी मोठ यश मिळाले. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने इतिहास घडवला आहे.  

या निमित्ताने भारतीय जनता पार्टी भुम ग्रामीण व शहर मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसामुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, ता. अध्यक्ष संतोष सुपेकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर,  ता. सरचिटणीस रघुनाथ वाघमोडे, ता. सरचिटणीस बिभीषण पवार, शहराध्यक्ष बाबासाहेब विर, नगरसेवक व शहर सरचिटणीस आबासाहेब मस्कर,  मा. अजाजा अध्यक्ष प्रदीप साठे, ता. महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती तनपुरे, भुम शहर युवा अध्यक्ष मुकुंद वाघमारे,  शहर चिटणीस निलेश शेळके,  शहर कामगार अध्यक्ष महादेव शेंडगे, राम वारे, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, भाजपा नेते चंद्रकांत गवळी,  ता. उपाध्यक्ष हेमंत देशमुख, शहर उपाध्यक्ष बंडू लोंढे, पंचायत राज ता. अध्यक्ष सुब्राव शिंदे, संदिप खामकर, चिंचोली शाखा अध्यक्ष बाबुराव साळूंखे, सोमनाथ वारे, श्रीपाद देशमुख, मीडिया प्रमुख शहर सिद्धार्थ जाधव, शांतिराज बोराडे, सुरेश उपरे, ऍड शिवाजी वनवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top