भूम (प्रतिनिधी)- विश्व जागृती मिशन सत्संग समिती, भूम यांच्या वतीने पूज्य सद्गुरू सुधांशूजी महाराज यांचा वाढदिवस दिनांक 2 मे 2026 रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात ‘उल्लास पर्व’ म्हणून साजरा करण्यात आला. येथील श्री रामेश्वर महादेव मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला-पुरुष भक्तांनी उपस्थित राहून सद्गुरूंच्या चरणी श्रद्धा व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री रामेश्वर महादेव प्रभूंच्या रुद्राभिषेकाने झाली. हा पवित्र धार्मिक विधी सौ. अर्चनाताई गोलेकार व श्री दीपकजी गोलेकार (सेवानिवृत्त पोलिस अधिकारी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या रुद्राभिषेकामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. यानंतर पूज्य सद्गुरू सुधांशूजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हॉटेल सन्मानचे मालक अंबादास वरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सद्गुरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या दीर्घायुष्य व मानवकल्याणासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी पूज्य महाराजांचे शिष्य ह.भ.प. अरुण शाळू महाराज यांचे प्रेरणादायी प्रवचन झाले. त्यांनी आपल्या प्रवचनातून सद्गुरू सुधांशूजी महाराज यांच्या अध्यात्मिक कार्याचा आढावा घेत भक्तांना जीवनात सत्य, सेवा, संस्कार आणि सदाचार यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या ओजस्वी वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमात श्री अंशुल अभिलाष महागावकर, पुणे यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाची सांगता भक्तिमय वातावरणात केली. या कार्यक्रमासाठी मंदिर तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विश्व जागृती मिशन सत्संग समितीचे पदाधिकारी, महिला मंडळ, तरुण मंडळ व असंख्य भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला. सद्गुरू सुधांशूजी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या या ‘उल्लास पर्वा’ने भूम शहरातील आध्यात्मिक वातावरण अधिक प्रसन्न व प्रेरणादायी बनले.
