तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या सेवेत नव्याने बनवलेले नगारा सोमवारी पारंपारिक पद्धतीने पूजन करून पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून तो सोमवारी रात्री देवी देवी मंदिरात दाखल झाल्यानंतर मंगळवारपासून नगारा चर्मवाद्य देवीचरणी सेवेत रुजू झाले. सदरील  कार्यक्रम देवीचे महंत तुकोजी बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाच्या वतीने संपन्न झाला.

श्री तुळजाभवानी माता मंदिरात धार्मिक विधी वेळी नगांरा वाजवले जाते. हे चर्मवाद्य म्हशीच्या कातड्यापासून बनवले जाते. यंदा नगरा बनवण्यासाठी नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांनी सहकार्य केले. सदरील नगारा हे चर्मवाद्य निंबाळकर दरवाजा जवळील खोलीत ठेवता. एक फुटला म्हणजे उतरला की दुसरा तयार केला जातो. यासाठी म्हशीचे कातडे वापरतात. हा नगारा करण्याचा मान विष्णू खंदारे परिवाराला आहे. हा नगारा बनवण्यासाठी आठ दिवस लागतात. सोमवारी विष्णू खंदारे यांच्या घरी तयार करण्यात आलेले नगरा चर्मवाद्य पूजन नगरसेविका प्रियंका विजय गंगणे त्यांचे पती विजय गंगणे, देवीचे महंत तुकोजी बुवा, महंत हम रोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते तहसीलदार तथा प्रशासकीय व्यवस्थापकीय अधिकारी माया माने, धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक अतुल ढमाले, अमोल भोसले, जयसिंग पाटील, विशाल रोचकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करण्यात आले. 

संबळाच्या कडकडाटात प्रथम नगाऱ्यावर गोमूत्र संपून नंतर नगाऱ्यास दोन वस्त्रपांगरण्यात आले. नंतर नगाऱ्याची ओटी भरण्यात आली. नंतर नगरास नैवेद्य दाखवून वरील मान्यवरांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर हा नगारा, संबळ तसेच पारंपारिक वाद्याच्या गजरात मातंग नगर येथील विष्णू खंदारे यांच्या घरापासून शहराच्या प्रमुख मार्गावरून पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आला. हा नगारा मंगळवार दिनांक 5 मेपासून श्री तुळजाभवानी मातेच्या सेवेत रुजू झाला. नगारा वाजवण्याचा मान नगारावाले जाधव परिवारकडे असून ते देवीच्या आरती वेळी सकाळ-संध्याकाळ व धार्मिक कार्यक्रम वेळी वाजवतात.


 
Top