भूम (प्रतिनिधी)- अवैद्य वाळू वाहतूक प्रकरणी तहसीलदार जयवंत पाटील यांच्या फिर्यादीवरून वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भूम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार जयवंत पाटील हे नायब तहसीलदार प्रवीण जाधव, ग्राम महसूलाधिकारी रवींद्र घुले यांच्यासह कारवाईसाठी गेले होते. यावेळी अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चा पाठलाग करण्यात आला. यावेळी त्याच्यालखाने टिप्पर मधील वाळू रस्त्यावर सांडली. तसेच अरुण मुरलीधर गवळी या दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकलने तहसीलदार यांच्या गाडीला अडथळा निर्माण होईल अशी कृती केली. त्या वेळेत टिप्पर चालक टिपर घेऊन पळून गेला. याप्रकरणी तहसीलदार जयवंत पाटील यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक अरुण गवळी, टिप्पर चालक, टिप्पर मालक, ट्रॅक्टर मालक व भैय्या चांगदेव महानवर या पाच जणांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक 16 रोजी तहसीलदार जयवंत पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी भोगलगाव शिवारात अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाल्याने शासकीय वाहनाने निघाले होते. ते गोलेगाव कडे जात असताना कसबा भूम येथे एक टिप्पर अवैध रित्या वाळू घेऊन जात असताना दिसला. त्या टिप्पर चा पाठलाग भूम शहरातील लहुजी नगर ते परंडा रोड यादरम्यान करण्यात आला. यावेळी पेपरचालकाने वाळू भरलेला भाग वर करून त्यावरील वाळू रस्त्यावर सांडून तहसीलदार पाठलाग करत असलेल्या गाडीला अडथळा निर्माण केला.
तेवढ्यात अरुण मुरलीधर गवळी या व्यक्तीने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल तहसीलदार पाठलाग करत असलेल्या शासकीय वाहनाच्या विरुद्ध दिशेने येऊन अवैदरीत्या उत्साह केलेल्या वाळूचा पेपर पळून जावा या उद्देशाने तहसीलदारांच्या गाडीसमोर पडून त्या टिप्परला पळून जाण्यास मदत परत शासकीय कामात अडथळा केला. त्यामुळे त्यात टिप्पर चा पाठलाग करता आला नाही. तसेच टिप्पर चा नंबर देखील अस्पष्ट व पुसलेला असल्याने स्पष्ट ओळखू येत नव्हता. त्यानंतर तहसीलदार हे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन भोगलगाव शिवारातील तळ्याजवळ गेले असता त्या ठिकाणी तहसीलदार कारवाई करण्यासाठी येत असल्याची चाहूल लागताच त्यांच्या वाहनासमोर भैय्या चांगदेव महानवर याने त्याच्या ताब्यातील एम एच 25 बीसी 78 74 ही मोटरसायकल जाणीवपूर्वक उभी केली व तहसीलदारांचा रस्ता अडवून शासकीय कामात अडथळा केला. त्यामुळे काही अंतरावर वाळवणी भरलेल्या टिप्पर चा पाठलाग तहसीलदारांना करता आला नाही. पुढे काही अंतरावर त्याची प्रचारकाने त्यातील ओलसर वाळू रस्त्याच्या बाजूला खाली करून तो पळून गेला. तसेच जवळच वाळवण्यासाठी पंप जोडलेला लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा अर्जुन 555 हा दिसून आला. धुण्यासाठी वापरत असल्याचे आढळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यामध्ये भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोहे का उमेश देवकर व शबाना मुल्ला हे तपास करत आहेत.
