धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 67 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केशव पाटील यांनी केले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य के .टी. पाटील सरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. गणित व विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच नीट जेईई परीक्षेत पात्र झालेल्या व एन .एम.एम.एस .परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच यावेळी सेवानिवृत्त शिक्षक आर.पी. पवार व संग्राम पाटील यांचा सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आला.

प्राचार्य नन्नवरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र दिनाचा इतिहास विदयार्थ्यासमोर मांडला.  यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक यशवंत इंगळे तसेच सर्व सेवानिवृत्त शिक्षक अरूण बोबडे, शाहूराज खोगरे, विक्रम सांडसे, आणि पर्यवेक्षक प्रवीण बागल,श्रीमती बी.बी. गुंड, कुमार निकम, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ, बालाजी गोरे, मोहन शिंदे,  तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील, सौ.जयमाला शिंदे  यांनी केले तर आभार उपप्राचार्य संतोष घार्गे यांनी मानले. शेवटी सर्व विदयार्थ्यांना निकालपत्रक वाटप करण्यात आले.


 
Top