परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील भोञा गावाचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते सुनिल दिगंबर पवार यांना  1 मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त पुणे येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र वडार मजुर शिल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने  2026 चा समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे महापौर  रवीभाऊ लाडगे, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर, मञालय गृह विभागाचे अधिकारी  यशवंतराव लष्करे  ,उच्च तञ शिक्षण विभागाचे अधिकारी सुधीर पवार, एम आय डी सी चिफ इंजिनियर कालीदास भाडेकर, जेष्ठ साहित्यिक  टि.एस चव्हाण, भारतीय सशस्त्र सेना दल पुणे चे अधिकारी कर्नल ॠषिकेश धोञे, ससुन हॉस्पिटल चे प्रशासकीय अधिकारी सदाशिवराव जाधव, सभापती, कैलास कुटे , विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर आलगुडे व उद्योजक  संजय भोसले व नितीन दादा धोञे, 

मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी दादा शिंदे, मजुर शिल्प प्रतिष्ठान चे शाम विटकर, पिटु जाधव व  विष्णू आण्णा चौगुले सोलापूरकर व सागर ओरसे व लखन पाटकर वडार एकता परीषद चे भरत विटकर व जेष्ठ पञकार  रमेश जेठे, नगरसेविका अर्पणा कुराडे, नगरसेविका सौ वैशाली काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे मोठ्या संख्येनेआजी माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक, मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शिल्पकार गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, गुणगौरव पुरस्कार, विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आले. सुनिल भाऊ पवार भोञेकर  यांना समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

 
Top