धाराशिव (प्रतिनिधी)- ज्ञानदिप सामाजिक विकास संस्थेच्यावतीने दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार - 2026 पुरस्कार पत्रकार लक्ष्मण शिंदे-पाटील यांना जाहीर झाला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले, सचिव मिलींद कळवणकर, उपाध्यक्ष एम.डी. प्रताप, खजिनदार अनिल कळंके यांनी एका पत्राद्वारे हा पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि इंदू मिल स्मारकाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते व रिपब्लिकन सेना युवा नेते ॲड.अमन आंबेडकर, नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, समाज कल्याण विभागाचे उपआयुक्त भगवान वीर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अविनाश शिंदे, नाशिक महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त नानासाहेब साळवे, संपादक सुधीर उमराळकर, दिनेश जाधव, भीमकन्या रिअल स्टार असावरी बर्वे यांच्या उपस्थितीत शनिवार दि.23 मे रोजी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नाशिक येथील वावरे नगरमधील पौर्णिमा स्वीट जवळील समुद्र लॉन्स कामटवाडे येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल शिंदे-पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
