धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 4 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल  यांना निवेदन देण्यात आले. यात मौजे नरसापूर तालुका भोर, जिल्हा पुणे येथे एक चार वर्षांच्या लहान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच काल चाकण येथे 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून अमानुष खुन, अत्याचार तिची निर्दयी हत्या हि केवळ संतापजनक नाही तर संपूर्ण समाजव्यवस्थेच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या मातीला काळीमा फासला असुन, मानवतेचा कळसच ढासळल्याचे चित्र समोर आले आहे. या राक्षसी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना कोणतीही दया ना दाखवता फासावर चढवावे. राज्यात खुन,बलात्कार,डग्ज तस्करी,दरोडे चोरी यांचे प्रमाण जास्त आहे. गृहमंत्री कांहीच कार्यवाही करत नाहीत. महाराष्ट्राची जनता प्रचंड आक्रोशात असुन केवळ निषेध,शोक आणि आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस आणि पारदर्शक कार्यवाही झाली नाही. तर जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे ढासळेल तरी राज्यपाल यांनी राज्य सरकारचा राजीनामा घ्यावा व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष सलिम औटी, शहराध्यक्ष निलेश जाधव, बबनराव वाघमारे, विनोद बलाडे,शहाजी गायकवाड आदी उपस्थित होते. 

 
Top