तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनात मंगळवार दिनांक 12 रोजी भाविकांची तुफान गर्दी झाली होती. मंदिर अक्षरशः भाविकांनी खर्चून भरून गेले होते. आज सुमारे लाखो भाविकांनी देवीचरणी दर्शन घेतले. तसेच हजारो नवविवाहित नवदांपत्याने वावर यात्रा केली.
पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन धर्मदर्शनास आरंभ झाला. सकाळी अभिषेक पूजा सहा वाजता सुरू होऊन दहा वाजता संपल्या. त्यानंतर देवीचे वस्त्र अलंकार पूजा करण्यात आली. आज दिवसभर धर्मदर्शन मंडप भाविकांनी भरून गेला होता. तसेच पेड दर्शन, मुखदर्शन रांगाही भाविकांनी भरभरून गेल्या होत्या. भाविक खाजगी वाहनांनी मोठ्या संख्येने आल्याने आज तीर्थक्षेत्र तुळजापूरला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाविकांचे देवदर्शन होताच भाविक बाजारपेठात प्रसाद साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. आज तापमान घटले असले तरी आभाळ असल्याने उखाड्यात प्रचंड वाढला होता. घामाच्या आधारित भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. सध्या सुट्टी असल्याने भाविक सहकुटुंब सहपरिवार श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनात गर्दी करत आहेत. भाविकांचा असाच ओघ शाळा सुरू होईपर्यंत राहणार आहे.

