धाराशिव (प्रतिनिधी)- “ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पुढे यावे. वैशालीचे यश हे संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद असून इतर युवतींसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक ॲड व्यंकट गुंड यांनी केले.
पाडोळी (आ.) येथील वैशाली दत्ता शिंदे हिची नागपूर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आकुबाई देवी मंदिरासमोर आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत वैशाली शिंदे हिचा पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, पतंजली योग समिती धाराशिवचे जिल्हाध्यक्ष राम ढेरे, पाडोळी (आ.) गावच्या सरपंच मंगलबताई वासुदेव एखंडे, उपसरपंच किससनराव माने, सतिश एखंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी कारखान्याचे संचालक भारतभाऊ गुंड, ॲड शरद गुंड, ग्रामपंचायत सदस्य जीवनभाऊ गुंड, नागटिळक, कर्मचारी आबासाहेब कांबळे, महेश शिंदे तसेच सत्कारमूर्तीचे आई-वडील व सह्याद्री अकॅडमी व दिशा सक्सेस अकॅडमी, धाराशिव येथील शिक्षकवृंद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास ग्रामस्थ व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
%20%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%AA.jpeg)