उमरगा (प्रतिनिधी)- मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान अंतर्गत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमरगा-लोहारा, तुळजापुर व औसा विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने बुथनिहाय नेमण्यात आलेल्या बी.एल.ए. यांचे प्रशिक्षण व संवाद बैठक शनिवार दि.16 मे रोजी शांताई मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यातील बी.एल.ए. यांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले.
उपस्थित बी.एल.ए. यांना मार्गदर्शन करताना धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुख उन्मेष पाटील यांनी सांगितले की, सध्या राज्यभरात मतदार यादी पुनर्निरीक्षण अभियान सुरू असुन यामध्ये पारदर्शकता व सुलभता येण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने बूथनिहाय बी.एल.ए. नेमण्यात आले आहेत. याप्रसंगी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जि.प.उपाध्यक्षा उषा गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवाड, धाराशिव जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, उमरगा पंचायत समिती सभापती ॲड.आकांक्षा चौगुले, लोहारा पंचायत समिती सभापती पल्लवी जानकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनाताई सोमजी, लातूर जिल्हाप्रमुख अर्चनाताई बिराजदार, उषा जाधव, सोमनाथ स्वामी, तानाजी सुरवसे, ज्ञानेश्वर घोडके, अमोल जाधव, आकाश कांबळे, दत्तोबा भोसले, बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील याच्यासह उमरगा-लोहारा, तुळजापुर व औसा मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. कायक्रमाचे सुत्रसंचलन युवराज गायकवाड यांनी केले. तर आभार माधव जाधव यांनी मानले.
