धाराशिव (प्रतिनिधी)- गोवंश हत्या, लव आणि लँड जिहाद, धर्मांतर यासारख्या हिंदू धर्मावर येणाऱ्या आपत्ती थांबवण्यासाठी हिंदू समाजाने आता जागृत होऊन संघटित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्यात्या हर्षाताई ठाकूर यांनी केले. त्या धाराशिव येथे सकल हिंदू समाज आयोजित हिंदू जागृती मेळाव्यात बोलत होत्या. 

धाराशिव येथे जय भवानी हिंदु संमेलन समितीच्या वतीने विराट हिंदू संमेलन नुकतेच पार पडले. यावेळी नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे व अंजली डुकरे यांनी मान्यवारांचे भारत मातेची प्रतिमा देऊन यथोचीत स्वागत केले.या संमेलनात प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते राजेश अंबादास संन्यासी , हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज एकंबीकर, मेडसिंगा उपस्थित होते.

गोवंश हत्या, लव्ह जिहाद सारखे प्रकार आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात होतात कसे? असा प्रश्न हर्षताई ठाकुर यांनी उपस्थितीत केला. धाराशिव व संभाजीनगर नामांतर वेळी काही सेक्युलर पुढे आले. हिंदू कधीच जाती भेद, उच नीच करीत नाही.  देवी देवतांची मूर्ती फोडून हिंदुची ५ लाख मंदिरे तोडली गेली आहेत. हिंदू हिंसक असता तर रामाचे मंदीर बांधायला ५०० वर्ष लागले नसते. मंदिर पाडून मशीद बांधली, मथुरा, काशी व ज्ञानवापी बाकी आहे असे त्या म्हणाल्या.

गोरक्षक जे धर्मकार्य करतात त्यांना राजकारणात स्थान देण्याची गरज असून कत्तलखाने पाडले, कारवाई केली तरी गोमांस पुन्हा पुन्हा का विकले जाते? त्यामागे कोण आहे हे शोधणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. आमिष देऊन ख्रिश्चन व मुस्लिम धर्मांतर केले जाते. तुळापुर येथे जायला हवे,जेथे धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले त्या स्थळाला नतमस्तक होण्याची गरज आहे. जाती जातीत भांडण करू नका. हिंदू धर्मासाठी संभाजी महाराज यांनी बलिदान दिले. बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे धर्म कार्य करतात त्यामुळे हिंदू धर्म वाचला आहे. सैलानी बाबाच्या समाधी खाली संतांच्या समाध्या आहेत, हा लैंड जिहाद आहे. कबर, थडगे उभी करून शासकीय जमिनी बळकावल्या जातात नंतर वक्फ बोर्ड येते व ताबा घेते असा आरोप त्यांनी केला. मुली जातात कुठे? याकडे पालकांचे लक्ष नाही. हिंदू मुस्लिम, निकाह व विवाह, मजहब व धर्म यातील फरक समजावा. हलाला काय आहे, धर्मातील फरक काय आहे ते सांगा. अखंड भारताचे  तुकडे धर्माच्या नावावर केले. मुलींना राजमाता जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा प्रेरणादायी इतिहास शिकवा, लाठी काठी शस्त्र चालवायला शिकवा मग मुली लव्ह जिहादमध्ये फसणार नाहीत. 

मुस्लिम वारकरी व शिव व्याख्याते यांची गरज नाही, आम्ही सक्षम आहोत.  अब्दुल कलाम पाहिजे मात्र अजमल कसाब नको आहे असे त्या म्हणाल्या. भारत देशात हजार दीड हजार वर्षापासून परकीय आक्रमणे झाली, हिंदुत्व भाव कमी झाला की देशावर आक्रमक, आघात झाले आहेत. ज्याची सुरुवात व शेवट नाही असे सनातन आहोत, विश्व उत्पत्ती व अंतापर्यंत हिंदू असणार आहे. हिंदू ही जीवनपद्धती आहे, सिंधू नदी पासून ही संस्कृती असुन देवभुमी आहे. आपण जे जीवन जगतो, वागतो ते हिंदुत्व आहे. पशु पक्षी दया सुद्धा शिकवतो. हिंदू सहिष्णू आहे, परशियनसह अन्य लोकांना भारतात आधार दिला, हिंदूनी कधी परकीय देशावर आक्रमण केले नाही, धर्मातर केले नाही असे ऋषी मुनी, संत महंत अशी परंपरा असुन भ्रमांड, सूर्यमाला, शुन्य, जुनी संस्कृती, शेती, संगीत, विज्ञान, साहित्य, आयुर्वेद हे जगाला दिले. जगाच्या विकासात हिंदूने मार्गदर्शन केले. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना मानवतेचा संदेश केवळ हिंदू देऊ शकतात असे राजेश संन्यासी म्हणाले,

भारताला माता तर नदी, पृथ्वीला आई, परस्त्री आईसमान मानतो, पुढच्या पिढीला वैचारिक वारसा सांगायचा आहे. लव्ह जिहाद सारख्या विकृतीकडे पाहायला हवे. हिंदू धर्मात खीला माता म्हणले जाते, इतर धर्मात ती एक उपभोग वस्तु आहे. आपला इतिहास बलिदानाचा आहे. गझनी, खिलजी, चंगेज अबद्दली, मुघल, अकबर यांचा इतिहास शिकवला मात्र चंद्रगुप्त, विक्रमादित्य, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोबिंद सिंह यासह इतर हिंदू राजांचा व त्यांच्या सरदार यांचा इतिहास शिकवला नाही. देशावरचे प्रेम वाढले तरच कुटुंबाबरच प्रेम वाढणार आहे.

सिंकदरला भारत कधीही जिंकता आला नाही. जिता वो चंद्रगुप्त हारा वो सिंकदर हे सांगावे लागेल असे संन्यासी म्हणाले. ग्रीक, यवन, शक, होन, मुस्लिम आक्रमणकारी आले मात्र त्यांना भारत जिंकता आले नाही. राजस्थान, पंजाबचा बलिदान व शौर्याचा इतिहास आहे. महिला व मंदीर यांची विटंबना करण्यात आली, त्यामुळे जोहर प्रथा आली. शख आणि शाख हे वापरून संत मैदानात उतरले हा गुरु तेग बहादूर, गुरु गोविंद सिंह यासह अन्य संतांचा इतिहास आहे, धर्मातर केले नाही म्हणुन त्यांना बलिदान द्यावे लागले, धर्मपरिवर्तन केले नाही म्हणुन संभाजी महाराज धर्मबीर म्हणुन ओळखले जातात.

सण व त्याला असलेले विज्ञान सांगावे लागेल. संस्कार, परंपरा, आस्था शिकवायला हवी. इतिहासकार खोटी माहिती जाणीवपूर्वक सांगतात तो तपासून शिकवायला हवे. कुटुंब प्रबोधन, स्वदेशी, सामाजिक समरसता, पर्यावरण व नागरी कर्तव्य हे पंचपरिवर्तन हे सूत्र सगळ्यांना सांगितले पाहिजे व त्या प्रमाणे आचरण करावे असे आवाहन संन्यासी यांनी केले. एकत्र भोजन, एकत्र भजन व एकत्र भ्रमण है पाळायला हवे, श्रद्धा व समर्पण, प्रथा परंपरा सांगितल्या तर व्यसनासह इतर बाईट काही होणार नाही. जेवताना मोबाईल व टीव्ही बंद असावी, नात्यात संशय निर्माण करणाऱ्या मालिका बंद कराव्यात नाहीतर घर फुटेल. जात पात, पक्ष विरहित विचार करावा, महापुरुष आदर व इतिहास समजून घ्यावा, व्यसनापासून लांब राहावे असे संन्यासी म्हणाले.

 
Top