धाराशिव (प्रतिनिधी)- मौ. आळणी, ता. जि.धाराशिव येथील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्यात यावी. तसेच गावातील सांडपाणी व्यवस्थापन,नालेसफाई व नालेदुरुस्तीची कामे तात्काळ करणेबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव प्रियंवदा महाडदळकर यांना आज आळणी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांसह अभयसिंह वीर, अशोक गाडे, विश्वजीत पाटील, युवराज कोळी, अजय गाडे, रियाज सय्यद, शुभम महामुनी यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी पाणीपुरवठ्याचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येईल. तसेच नालेसफाई व संबंधित इतर कामे पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात येतील असे आश्वासन प्रियंवदा महाडदळकर यांनी दिले आहे.

