भूम (प्रतिनिधी)-  प्रत्येक बूथ प्रमुख आणि जबाबदार कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभाग वार्डाच्या मतदार यादीच सूक्ष्म नियोजन करून एस आय आर नुसार शुद्धीकरण करून घेतल्यास भविष्यात निश्चितपणे पुन्हा एकदा सत्तेची सूत्र भाजपच्याच हाती येतील असा विश्वास पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुनील राणे यांनी भूम येथील कार्यशाळेत बोलताना विश्वास व्यक्त केला.

बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी भारतीय जनता पार्टीच्या भूम परंडा वाशी विभाग स्तरावरील एसआयआर अभियान कार्यशाळा प्रदेश सरचिटणीस आमदार सुनील राणे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील, मराठवाडा संयोजक नितीन काळे, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, एसआयआर परांडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, एड. अनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे भूम तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, परंडा एड. गणेश खरसडे, तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे, वाशी उपनगराध्यक्षा लक्षमी साठे, परंडा उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर, परंडा विधानसभा अध्यक्ष सुरेश कवडे यांच्यासह तिन्ही तालुक्यातील बुथ प्रमुख एस आय आर अंतर्गत प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.


 
Top