धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ मदनसिंह गोलवाल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा विवेकानंद चव्हाण डॉ मंगेश भोसले, प्रा माधव उगिले, डॉ दत्तात्रय साखरे, प्रा सचिन चव्हाण, इंग्रजी विषय प्रमुख प्रा क्षीरसागर, सुमेर कांबळे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.

 
Top