धाराशिव (प्रतिनिधी)-  श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलितशिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. कृष्णा लांडगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाने नुकतीच पी एचडी प्रदान केली. दिनांक 22 /04/2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवीच्या मौखिक परीक्षेमध्ये कृष्णा दगडू लांडगे यांनी अर्थशास्त्र विषयात यश संपादन केले आहे. त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाची दखल घेऊन विद्यापीठाने त्यांना नुकतीच पी.एचडी. पदवी प्रदान केली.

प्रा. कृष्णा लांडगे यांनी खवा उत्पादकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास: विशेष संदर्भ उस्मानाबाद जिल्हा“ या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. हे महत्त्वपूर्ण संशोधन त्यांनी अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. आर. पी. ढवण यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. 

 
Top