धाराशिव (प्रतिनिधी)-  1 लाख 29 हजार विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. त्यापैकी मोजक्या विद्यार्थ्यांना पेपर फुटीचा लाभ झाला. नीट परीक्षा घेणारी संस्था ही युपीएससी प्रमाणे स्वतंत्र संस्था असावी. तरच नीटच्या परीक्षा या स्वच्छ वातावरणात होवू शकतात. यासाठी आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे माहिती सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शनिवार दि. 23 मे रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सुधीर पाटील यांनी सांगितले की, पेपर फुटीमुळे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. महाराष्ट्रातून या परिक्षेसाठी 63 हजार विद्यार्थी बसले होते. असे सांगून पाटील यांनी सांगितले की, 2 वर्षांपूर्वी मोटेगावकर इथे आले होते, त्यावेळी ते म्हणाले की आपल्याकडे काही आर्थिक क्षमता असलेले विद्यार्थी मिळू शकतात का, त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने पास करू शकतो असे म्हणाले, तेव्हा आम्ही नकार दिला. त्यांची 5 लाख, 3 लाख व 60 हजार अशी वेगवेगळी फीस आहे. आर्थिक निकषावर जर हे होत असेल तर सामान्य मुलांनी शिकायचे नाही का ? असा सवाल केला. देशाचे भवितव्य ठरवणारी ही परीक्षा असुन पारदर्शकपणा असला पाहिजेत. 



पीसीबी ग्रुपवर आधी निवड व्हायची

शिक्षण संस्थेकडून  विद्यार्थ्यांची परीपुर्ण अभ्यासाची तयारी करून घेतली जात असत. विद्यार्थ्यांची पीसीबी ग्रुपवर आधी निवड व्हायची. त्यामुळे शिक्षण संस्था व शाळेला मोठ्या प्रमाणात महत्व होते. 2019 पासुन एनटीए ही सोसायटी ऍक्ट खाली नोंदणी असुन ते प्रिंटिंगसह इतर यंत्रणा आऊट सोर्सिंग करतात. एमबीबीएस झालेले विद्यार्थी पुढे युपीएससी करतात. नीट घोटाळा देशभर असुन त्यांचे धागेदोरे दुरवर पसरले आहेत. युपीएससी सारखी रचना असलेले मंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. सरकारने हे केले नाही तर येत्या काळात यासाठी कोर्टात जनहीत याचिका करणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुधीर पाटील यांनी केली आहे. 

 
Top