धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे सालाबादाप्रमाणे यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेत 121 विदयार्थी पात्र ठरले असून हे देदिप्यमान यश प्रशालेने प्राप्त केले आहे.
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये 200 पेक्षा अधिक गुण घेणारे 9 विद्यार्थी आहेत. इयत्ता पाचवीमध्ये प्रथम क्रमांकावर कआरोही अर्जुने हिने 276 गुण घेतले. तर द्वितीय क्रमांकावर वाघमारे परिक्षित 252 गुण, तर तृतीय क्रमांकावर देशमुख समरजित 230 गुण, चौथ्या स्थानावर शिंदे आयुष याला 224
गुण, तर पाचव्या स्थानावर असलेला कवडे श्रीतेज 222 गुण, तर सहाव्या क्रमांकावर पवार आरोषी 218, सातव्या क्रमांकावर सावळे आदित्य 208, टेकाळे प्रसन्ना 208, आठव्या क्रमांकावर म्हेत्रे प्रणव 204 गुण प्राप्त झाले.
या घवघवीत यथाबद्दल आदर्श आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उप मुख्याध्यापक यशवंत इंगळे तसेच पर्यवेक्षक तथा स्कॉलरशिप विभाग प्रमुख कुमार निकम, राजेंद्र जाधव, बी. बी. गुंड, प्रवीण बागल, शेषनाथ वाघ, बालाजी गोरे, डॉ.विनोद आंबेवाडीकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे,पालकांचे व संबंधित स्कॉलरशिपचे विषय शिकवणाऱ्या सर्व शिक्षक ए. एच. माने, डी. यू. ओव्हाळ, ए. आर. बोपलकर, डी. एन. जारवाल, के.ए.लोंढे, एस. एच. जगताप, डी. एल. कांबळे, एस.एम. राऊत व पाचवी स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख आर. बी.चौधरी यांचे अभिनंदन केले.