धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तिभावाने येतात.      

श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.   माहे जून 2026 मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत, पुजारी, सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी. भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://online.shrituljabhavani .orgयावर सिंहासन पुजा नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. माहे जून - 2026 या महिन्यात सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.भाविकांनी सिंहासन पूजेसाठी  http://online. shrituljabhavani.org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.सिंहासन पुजा नोंदणी 19 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून सुरू झाली आहे.ती 24 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत करता येईल.ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 27 मे 2026 रोजी 11 वाजता पाठविण्यात येतील. भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 27 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजतापासून ते 28 मेपर्यंत सकाळी 10 वाजतापर्यंत करावे.            

सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 28 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील. भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 28 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करावे.प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 29 मे रोजी सकाळी 11 वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील. भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 29 मे रोजी सकाळी 11 ते 30 मे  रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत करावे. माहे जून -2026 या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल. भाविकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, संस्थान तुळजापूरच्या व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.


 
Top