धाराशिव (प्रतिनिधी)- स्व.डॉ.सौ.चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रामधून सन 2026 मध्ये एकूण 14 विद्यार्थी विविध पदावर यशस्वी झालेले असून, यामध्ये अतुल करवर (महसूल सहाय्यक सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई,) अविनाश वाघमारे (धाराशिव पोलीस कॉन्स्टेबल), अभिजित ओव्हाळ (धाराशिव पोलीस कॉन्स्टेबल),रामलिंग निलाखे (धाराशिव पोलीस), कृष्णा कुंभार (बीड पोलीस कॉन्स्टेबल), शंकर पालखे (मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल) या विविध या पदावर यशस्वी झालेले आहेत. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांंच्या आशीर्वादाने व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 3 मार्च 2014 पासून हा उपक्रम सुरू असून या उपक्रमातून हजारो विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. हा उपक्रम होतकरू गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी बहुमूल्य उपक्रम आहे. आज या यशस्वी विद्यार्थ्यांचा राणादादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top