भूम (प्रतिनिधी)-  माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या आदेशानुसार “गाव भेट दौरा अभियान” अंतर्गत सामनगाव व वालवड येथे दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्या थेट आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्यापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

“विकास हेच व्हिजन” या संकल्पनेतून जनतेसमोर जाण्याचा निर्धार आम्ही केला असून गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्या मार्गी लावण्याचे काम करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामस्थांच्या समस्या गावात जाऊन जाणून घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या गाव भेट दौरा अभियानाला बाजार समिती संचालक विशाल बापू ढगे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी काळे, पंचायत समिती सदस्य शंकर सुबगुडे, बाजार समितीचे माजी सभापती निलेश तात्या शेळवणे, किशोर अंधारे, विशाल आप्पा अंधारे, बाजार समिती संचालक समाधान सातव, युवराज तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वालवड व सामनगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये हरिदास सावंत, कृष्णा मोहिते, दत्तात्रेय कुंभार, जेलानी शेख, सुनील यादव, उमेश मोहिते, संदीप पाटील, विष्णू सुबुगडे, जितेंद्र मगर, वैभव पाटील, शहाजी खटके, हारी मोरे, पमू मोरे, बंडू खंडागळे, बालाजी गोफणे, सचिन गोफणे, व्यंकट खटके, कांतीलाल खटके, गहिनीनाथ खटके, उमेश गोडसे, अरुण खंडागळे, वखार काळे, गयास काळे, उमेश मदने, रमेश कांबळे, श्यामराव जाधव  सह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top