धाराशिव (प्रतिनिधी)- पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या वाढत्या किमती ओळखून भारत सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकलला बनविणे व त्याचा वापर करण्यासाठी भारत सरकारने दिलेले प्रोत्साहनमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे, 2024 मध्ये 20 लाख इलेक्ट्रिक व्हेईकलचा विक्रीचा टप्पा ओलांडला गेला आहे. सरकारने 2030 पर्यंत 30% नवीन वाहन विक्री इलेक्ट्रिक व्हेईकलची करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, या वाढीसोबतच मुख्य आव्हान म्हणजे 'रेंज अँक्झायटी' (बॅटरी संपण्याची भीती), अपुरी चार्जिंग सुविधा, आणि पारंपरिक प्लग-इन चार्जिंगची गैरसोय तिचेच प्लग-इन चार्जिंगमध्ये वायर, कनेक्टर यांचा झीज होणे, वीजेचा धक्का बसण्याचा धोका, आणि पावसासारख्या वातावरणात अडचणी येतात. वायरलेस चार्जिंगमध्ये या सर्व समस्या नाहीशा होतात. वाहन पार्किंग स्पॉटवर किंवा रस्त्यावर आपोआप चार्ज होऊ शकते, ज्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होतो आणि सुरक्षितता वाढते या गोष्टी लक्ष्यात घेऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील एम टेक द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कुमारी अश्विनी दिगंबर मीठा हिने काळाची गरज ओळखून “सोलर बेसेड वायरलेस ई व्ही चार्जिंग स्टेशन विथ आय ओ टी इनेबल्ड ई व्ही बॅटरी मॉनिटरिंग“ या प्रोजेक्टची नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार केला आहे.वायरलेस चार्जिंगला सौर ऊर्जेसोबत जोडल्यास ते अधिक पर्यावरणपूरक आणि शाश्वत आहे. या प्रोजेक्टची सौर ऊर्जा निर्मिती, आयोटी मोनेटरींग, बॅटरी संरक्षण व पर्यावरणपूरकता ही वैशिष्ट्ये आहेत. ह्या प्रोजेक्ट निर्मितीसाठी सोलर पॅनल, सोलार चार्ज कनेक्टर, लीड ऍसिड बॅटरी, एलसीडी डिस्प्ले, वायफाय मॉड्युल, रिले मॉड्युल,
आरडीनो मायक्रो कंट्रोलर, पावर ट्रांजिस्टर, ट्रान्समीटर अँड रिसिविंग कॉइल, टेंपरेचर सेंसर पोस्ट बटन, बजर इत्यादी कॉम्पोनंट वापरले आहेत. बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी चार तास लागतात व चारशे किलोमीटर गाडी धावू शकते. या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी विभागाचे प्रा. व्ही.ए. डावरे आणि पीजी कॉर्डिनेटर प्राध्यापक एस. जी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले असून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन चे विभाग प्रमुख डॉ. प्रशांत कोल्हे यांनी कौतुक केले आहे.
“सौरऊर्जेवर आधारित बिनतारी विद्युत वाहन चार्जिंग ही केवळ तंत्रज्ञानावर आधारित नवीन संकल्पना नसून, भारतातील परिवर्तनाला गती देणारे महत्त्वाचे साधन असल्यामुळे या विद्यार्थिनीने केलेल्या कामाचे व बनविलेल्या नमुना प्रतिकृतीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. माने यांनी विशेष प्रशंसा करून या प्रतिकृतीचे मोठ्या उपक्रमात रूपांतर होण्यासाठी महाविद्यालय सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी सांगितले आहे.“
