धाराशिव (प्रतिनिधी) - 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला धाराशिव जिल्ह्यातील उन्हाच्या तीव्रतेचा उच्चांक झालेला असताना मानसाच्या जीवाची लाहीलाही होत असताना वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी हे दुर्मिळ झालेली आहे. 

हे मुके प्राणी पाण्यासाठी वन वन भटकताना दिसून येतात यामुळे जंगलातील हरीण, ससे, मोर व इत्यादी प्राण्यांना वन विभागाच्या वतीने पाणवठे तयार केलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पाणी सोडण्यात आले व जंगली प्राण्यांची वन वन थांबवली.  मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही संकल्पना राबवण्यात आली. यावेळी शिक्षक सेनेचे नेते बबनराव वाघमारे, विद्यार्थी सेनेचे तन्मय वाघमारे व सामाजिक कार्यकर्ते अकबर काझी हे उपस्थित होते.


 
Top