धाराशिव (प्रतिनिधी) - प्राथमिक आरोग्य केंद्र समुद्रवाणी अंतर्गत मोजे दारफळ येथील आरोग्य उपकेद्र नवीन इमारत लोकार्पण सोहळा उद्घघाटन प्रदीप शिंदे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रशांत रणदिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रवींद्र जाधव ,रणजीत इंगळे, श्री सचिन जाधव, शशिकांत इंगळे. प्रमोद पाटील, अण्णासाहेब चव्हाण ,प्राथमिक आरोग्य केंद्र समुद्रवाणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तेरकर, जिल्हा आरोग्य सहायक तानाजी क्षीरसागर, आरोग्य निरीक्षक, काशीद एम. बी.आशा सुपरवायझर कविता धनके, आरोग्य उपकेंद्र दारफळ येथील समुदाय आरोग्य अधिकारी प्रियजीत गायकवाड, आरोग्य सेवक साबळे बालाजी, आरोग्य सेविका, आरोग्य सेविका पवार मंगल व सर्व आशाताई सारिका ओव्हाळ,अलका गवळी,बबिता कोळी तसेच ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व नागरिक उपस्थित होते.
