वय अवघं 1617 वर्षं अजून नीट मिश्याही फुटल्या नव्हत्या. शालेय शिक्षण पूर्ण करून कॉलेज जीवनात प्रवेश करण्याच्या वयात, स्वतःसाठी करिअरची स्वप्नं पाहण्याऐवजी संघ परिवारातील एका संघटन श्रेणीचं काम करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि गळ्यात भाजपचा शेला टाकत आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.
घरची परिस्थिती अत्यंत साधी आई-वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार. वडील पोलिस प्रशासनात नोकरीला. मोठा भाऊ मध्ये कार्यरत, तर दत्ता भाऊ भाजपमध्ये कार्यरत. आणि तो काळ काँग्रेसच्या वर्चस्वाचा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष शिवसेनेचा प्रभाव इतका होता की भाजपची गिनतीही नव्हती. अशा परिस्थितीत काम करताना “कधी भाजप सत्तेत येईल का?” हा प्रश्न कधी पडला नाही.
पण दत्ता भाऊंनी परिस्थितीकडे न पाहता विचारधारेवर विश्वास ठेवला. संघ विचारांवर नितांत निष्ठा ठेवत पक्षाचं काम सुरू ठेवलं. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे काही ना काही काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. एका बाजूला उपजीविकेसाठी संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचे कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आणि संघटन उभारणीचं काम सुरूच होतं.
त्याकाळी पक्षनिधी नव्हता कार्यक्रमांसाठी समाजातून मदत गोळा करावी लागायची किंवा स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागायचा. संघ विचारांशी आणि पक्षाशी तडजोड करून दुसरा मार्ग त्यांनी कधीच स्वीकारला नाही. परिस्थिती स्वीकारली, संघर्ष स्वीकारला आणि अविरतपणे काम सुरू ठेवलं. काही काळ त्यांनी छोटे वेगवेगळे व्यवसायही केला, पण पक्षकार्याची नाळ कधी तुटू दिली नाही. पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. कार्यकर्त्यांची फळी उभी केली, संघटन मजबूत केलं आणि त्याच कामाची दखल घेत पक्षाने 2016 मध्ये त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.
2017 च्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे विक्रमी संख्येने प्रतिनिधी निवडून आले. आणि आता 2025 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदांवर भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यापासून हा माणूस पायाला भिंगरी लावून गावोगावी फिरतोय ते फक्त आणि फक्त पक्ष वाढला पाहिजे, कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे आणि संघ विचार घराघरात पोहोचला पाहिजे या ध्यासाने. आज सिद्धीविनायक परिवाराच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देण्याचं काम ते करत आहेत. राजकारणासोबत सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवण्याचं कार्यही ते तितक्याच ताकदीने करत आहेत. जर पक्ष संघटन अधिक मजबूत करायचं असेल, संघ विचार अधिक व्यापक करायचा असेल आणि लातूरबीडधाराशिवच्या विकासाला नवी दिशा द्यायची असेल, तर दत्ता भाऊ कुलकर्णी यांना विधानपरिषदेवर संधी मिळालीच पाहिजे. कारण माणूस जातीवर नाही, तर कर्तृत्वावर मोठा होतो आणि भाजप हा कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे.
दत्ता भाऊ कुलकर्णी यांना संधी देऊन पाहायेत्या काळात लातूर, बीड आणि धाराशिवच्या विकासाचा आणि पक्ष संघटनेच्या विस्ताराचा कायापालट झालेला दिसेल, हा विश्वास आहे.
निखील हुंडेकर
जिल्हा सरचिटणीस
युवा मोर्चा धाराशिव
