तुळजापूर (प्रतिनिधी)-  विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे राष्ट्रीय संयोजक किशनजी प्रजापत यांनी तुळजापूर येथील रुपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह व रुपामाता परिवार-फाऊंडेशन कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड पाटील, जिल्हा महामंत्री विजयराव वाघमारे व जिल्हा संयोजक राजकुमार गाढवे यांच्या हस्ते त्यांना आई तुळजाभवानीची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी विभाग गोरक्षा प्रमुख  दिनेश धनके, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुदर्शन महाराज साखरे, प्रणव रायचुरकर, पृथ्वीराज मोरे, तनिष्क रोचकरी, आशिष कांबळे, अनिकेत नवले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीदरम्यान संघटनेच्या कार्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध सामाजिक व राजकीय विषयांवर सखोल चर्चा होऊन परस्पर सहकार्याच्या दृष्टीने सकारात्मक विचारमंथन झाले.

 
Top