धाराशिव (प्रतिनिधी)-  योगासन भारत च्या वतीने वतीने घेण्यात जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा निवडचाचणी तुन धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. 

सोनिपत हरियाणा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात या निवडचाचणी घेण्यात आली होती. सब जुनियर, जुनियर व सिनियर वयोगटातील विविध प्रकारातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ 3 योगपटू निवडचाचणीत सहभागी करण्यात आले होते. महाराष्ट्र संघाकडून सहभागी धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सब जुनियर मुलींच्या वयोगटात फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात हिंदवी चौरे हिची तर सिनियर पुरुष वयोगटात ट्विस्टिंग बॉडी प्रकारात सतीश साबळे यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

10 मे ते 2 जून दरम्यान अहमदाबाद (गुजरात) येथे वर्ल्ड योगासन च्या अधिपत्याखाली योगासन भारत च्या वतीने या स्पर्धा होणार आहेत. हिंदवी आणि सतीश यांची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल धाराशीव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष अतुल अजमेरा, उपाध्यक्ष गौरव बागल, डॉ स्वाती लाकाळ, सचिव स्वाती गडदे, सहसचिव राजेश बिलकुले, योगेश थोरबोले, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, संचालक प्रणाली जगदाळे, सीमा चौरे, अश्विनी जाधव, इंदुमती जाधव, रामेश्वर सावंत आदिसह जिल्ह्यातील योगप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top