तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील: ग्रामपंचायत वडगांव (काटी) येथील अभिलेखे उपलब्ध न करणे, वारंवार नोटिसा देऊनही अंमलबजावणी न करणे, गंभीर अनियमितता, दिशाभूल करणारा पत्रव्यवहार संबंधितांवर कारवाई न केल्या च्या निषेधार्थ नीलाताई काशिनाथ डोके वृद्ध महिलेने तुळजापूर पंचायत समिती समोर भर उन्हात सोमवार दि. 4 मेपासुन मी आमरण उपोषण सुरू केले आहे.
याप्रकरणी विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी निलाबाई काशिनाथ डोके, रा. ग्रामपंचायत वडगांव (काटी), ता. तुळजापूर, जि. धाराशिव ठेवून प्रतिनिधित्वाची जबाबदारी दिलेली होती. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी ग्रामपंचायतीतील विकासकामे, मंजूर निधी, खर्च तपशील, ठराव पुस्तके, बिल व्हाउचर, मोजमाप पुस्तके, नोंदवही, अभिलेखे व इतर कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती मिळण्यासाठी मी सातत्याने अर्ज, निवेदने व तक्रारी सादर केलेल्या आहेत. तथापि, संबंधित सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व पंचायत समिती प्रशासनाकडून आजपर्यंत मागितलेली माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. केवळ नोटिसा देण्यात आल्या; परंतु त्या नोटिसांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. परिणामी संबंधितांनी प्रशासनाच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून आजपर्यंत कोणतेही अभिलेखे उपलब्ध केलेले नाहीत. यावरून केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असून प्रत्यक्षकर्तव्यपालन, चौकशी व उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात
दिनांक 06/04/2026 रोजी सरपंच व ग्रामसेवक यांना पुन्हा नोटीस देण्यात आली. त्याच दिवशी गटविकास अधिकारी यांनी अभिलेखे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मी प्रशासनावर विश्वास ठेवून वेळ दिला; मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर हे आमरण उपोषण सुरू केला असून या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपोषणाला पंचायत समिती सदस्य गोविंद डोंगरे यांनी पाठिंबा दिला.
