भुम (प्रतिनिधी)-  आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय माणूस घडत नाही. संघर्ष करत असताना येणाऱ्या अडथळ्याला सामोरे जाण्याची मानसिकता असेल तरच यश मिळते. कर्तव्यामध्ये सहकार्य आणि सातत्याची साथ होती म्हणूनच अखंडपणे सेवा करता आली. सेवानिवृत्तीनंतर देखील आपण सामाजिक कार्यात सहभागी होणारा असल्याची ग्वाही शिक्षण विस्ताराधिकारी सोमनाथ टकले यांनी उपस्थिताना या कार्यक्रमांमध्ये दिली.

 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांची उपस्थिती होती. राहुल भट्टी गट शिक्षणाधिकारी भूम, सूर्यभान हाके गटशिक्षणाधिकारी परांडा, सोमनाथ घोलप गटशिक्षणाधिकारी वाशी, हटयोगी दिगंबर, बरडे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखेच्यावतीने टकले यांचा सत्कार करण्यात आला.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित भूम, खोपेश्वर शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित ईट, आलमप्रभू शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित भूम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी शाखा भूम यांनी टकले यांचा सन्मान केला. यावेळी सामाजिक राजकीय व्यावसायिक व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण विभूते, दीपक वाळके यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुबाई गोपाळघरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले.

 
Top