तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापुरात शक्ती आणि भक्ती एकत्र नांदत असल्याने हे पवित्र स्थळास अन्यन साधारण महत्त्व असल्याने यये ‌‘श्री दत्त दुर्गा महाअनुष्ठान‌’चे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाची सुरुवात 30 मे 2025 रोजी होणार आहे. तर समारोप 6 जून 2025 रोजी होणार आहे. अशी माहीती या अनुष्ठानाचे आयोजक गुरुतत्व प्रदीप यांनी दिली.

या महाअनुष्ठानात दररोज विविध धार्मिक विधी, पूजा व पारायणांचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, गुरुचरित्र कथामृत, पंचकुंडात्मक हवन, सहस्त्र आवर्तन पूजन, कुमकुमार्चन, अभिषेक, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी अन्नदान सेवा, पाणी सेवा तसेच सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. परंपरा जपत भक्तीभाव वाढवणे, संस्कृती संवर्धन करणे आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

याशिवाय, जोगवा यात्रा देखील या अनुष्ठानाचा विशेष भाग असून ती 14 ऑगस्ट 2025 रोजी तुळजापूर येथून प्रारंभ होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2025 रोजी समारोप होणार आहे. 1008  पारायण मालिका असून तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे नवे पारायण होत आहे. या सोहळ्याचा सांगता पंढरपूर येथे अकरावे पारायण होणार आहे. संस्कारक्षम पिढी निर्माण झाली तर वृद्धाश्रम ची गरज भासणार नाही सुयोग्य गुरुभक्तीसाठी अशा पाराण्याच्या आयोजन केले जात आहे. या पारायणामुळे मुंबई पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटीन शहरात घरातील बंद झालेले नित्य देवपुजा सुरू झाल्याचे यावेळी म्हणाले. या पारायण सोहळ्यात वाचक संकल्प असून सेवेकरी 300 असतील स्थानिक 300 ते 400 वाचक असणार आहेत.


 
Top