धाराशिव (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त धाराशिव जिल्ह्य़ातील  चोराखळी येथील पापनाश मंदिरात जाऊन अभिषेक पूजा करून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती उत्सवास प्रारंभ करण्यात आला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शिवभक्ती ही सर्वांनाच माहिती आहे. त्या प्रत्येक काम करताना शिवांकर अज्ञाअसे म्हणूनच शिवशंभु चा आशीर्वाद घेऊनच कामाची सुरुवात करत असत. जयंती उत्सवाची एक चांगली सुरुवात म्हणून  अहिल्यादेवींचे आजोळ असलेल्या चोराखळी गावी पापनाश मंदिरात अहिल्या सखी मंच  धाराशिव यांच्या वतीने जयंतीनिमित्त अतिशय प्रसन्न व आलाददायक अशा वातावरणामध्ये अभिषेक महापूजा संपन्न करण्यात आली . तेथील येणार  जाणाऱ्या भाविक भक्तांना प्रसाद म्हणून फळांचे वाटपही अहिल्या सखी मंचच्या वतीने करण्यात आले. यावेळी अहिल्या सखी मंच च्या अध्यक्षा डॉ. शैलजा कुलकर्णी, उपाध्यक्षा एडवोकेट जयश्री तेरकर,  सचिव सौ. उषा लांडगे, कोषाध्यक्ष सौ. प्रमिला बावकर, सोबतच अर्चना मैंदाड,  सौ लक्ष्मी देवकते ,सुप्रिया दूधभाते ,रेखा जेवळीकर, शीलादेवी काकडे, भागीरथी शिंपले  तसेच अहिल्या सखी मंच मधील इतर सख्या उपस्थितीत  होत्या. अहिल्या सखी मंच अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत असल्यामुळे चोराखळी येथील ग्रामस्थांनी अहिल्या सखी मंच मधील सर्व सख्यांचा  सन्मानही केला.व प्रसादिक भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली.

तीर्थक्षेत्र पापनाश मंदिर बद्दलची माहिती तसेच अहिल्यादेवीं यांच्या आजोळची ,माहिती अतिशय समर्पक अशा भाषेत श्री मल्हारी नवले यांनी सांगितली. 

 
Top