धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यंदाचे पुरस्कार साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी आज जाहीर केले आहेत, साहित्य क्षेत्रातील कवी किशोर टिळेकर ( पुणे) यांना संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय साहित्यरत्न तर साक्षी जमादार (उमरगा) यांना सावित्रीबाई फुले युवा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार तर पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दत्तात्रय भोंगळे (सासवड) यांना तानूबाई बिर्जे राज्यस्तरीय पत्रकाररत्न जीवनगौरव पुरस्कार, विनोद राऊत (मुंबई) यांना तानूबाई बिर्जे राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार, गणेश मोरे तानूबाई बिर्जे राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक 29 मे 2026 रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण होणार आहे,या साहित्य संमेलनास देशभरातून 900 साहित्यिक उपस्थित राहणार आहेत,विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास घाडगे पाटील, संमेलनाचे मुख्य संयोजक ज्ञानेश्वर पतंगे,परमेश्वर पालकर,तुकाराम गंगावणे आदीजण उपस्थित राहणार आहेत.




