धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या संस्कार भारती या अखिल भारतीय कलावंताच्या संघटनेचे कार्य लक्षात घेता निश्चितच “भारते नवजीवन... “या अनुरूप जगामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या भारतीय संस्कृतीमुळे देशामध्ये उत्तम सांस्कृतिक वातावरण निर्मिती होईल असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केले. याप्रसंगी देवगिरी प्रांत निर्मित वंदेमातरम्‌‍ 150 वर्ष व राष्ट्रीय संघ शताब्दी वर्ष विषयावर मुद्रीत दैनंदिनी मुख्यमंत्री यांना प्रांत महामंत्री डॉ. जगदीक्ष देशमुख , सह महामंत्री डॉ. सतिश महामुनी , दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ यांच्या हस्ते भेट देण्यात आली. महाराष्ट्र गुजरात व गोवा प्रदेशातील 125 कलासाधक प्रतिनिधींची या अखिल भारतीय प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थिती होती.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा संस्कार भारतीचे प्रांतअध्यक्ष डॉ .भूषण भावे, अखिल भारतीय म्हणजे कला विधाप्रमुख देवेंद्र रावत, नागेशी मंदिर संस्थांचे अध्यक्ष संजय प्रयोलकर, महालक्ष्मी देवस्थान अध्यक्ष हर्षद कामत, अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजीत गोखले, अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी, आशुतोष आडोणी, पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, रवींद्र बेडेकर, आदी प्रतिनिधी उपस्थित होते. 22 मे येथे 24 मे 2026 या काळात गोव्यातील फोंडा येथे नागेशी देवस्थान परिसरात ही अखिल भारतीय प्रशिक्षण सभा संपन्न झाली. 

संस्कार भारतीच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने गेल्या काही वर्षांमध्ये संस्कार भारतीच्या संघटनात्मक व धोरणात्मक बाबींवर काळानुरूप बदल करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले  आहेत, या तीन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये या सर्व विषयाचे सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्कार भारतीची स्थापना पार्श्वभूमी आणि कार्य परिणाम तसेच भविष्यातील संकल्पना या विषयावर अखिल भारतीय प्रतिनिधी देवेंद्र रावत यांनी विचार मांडले. या विषयाच्या अनुषंगाने संस्कार भारतीच्या वाढीसाठी हे महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. अखिल भारतीय प्रतिनिधी आशुतोष अडोणी यांनी दुसऱ्या क्षेत्रामध्ये संस्कार भारतीचे कार्य उपक्रम स्वरूप आणि त्याची व्याप्ती या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. आपल्या प्रभावी मांडणी मधून संस्कार भारतीच्या या नव्या बदलांची उपयुक्तता त्यांनी बोलून दाखवली. ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी तिसरा सत्रामध्ये हिंदुत्व भारतीय कला दृष्टी हा अत्यंत समग्र विषय आपल्या अनुभवी अभ्यासामधून उपस्थित प्रतिनिधी समोर मांडला. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि कला दृष्टीच्या अनुषंगाने हिंदुत्वासाठी केले जाणारे कार्य या विषयावर त्यांनी विचार मांडले. पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांनी कार्यकर्त्याची निवड आणि कार्यकारणीची स्थापना या विषयाच्या अनुषंगाने विषय मांडणी केली. दोन दिवस अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी यांनी संस्कार भारतीच्या ध्येय गीतावर उद्बोधन केले. सूत्र क्रमांक चार मध्ये अखिल भारतीय मंत्री अश्विन दळवी यांनी संस्कार भारतीची कला विभाग त्याची रचना व संकल्पना या नव्याने बदल केलेल्या धोरणांची स्पष्टता केली. संस्कार भारतीचे कार्यक्रम त्याची पूर्वतयारी आणि संकल्पना पूर्ती या विषयाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक पर क्षेत्र विवेक कवठेकर व उदय शेवडे यांनी घेतले. या सत्रात  शब्दांनी बोलण्यापेक्षा संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांना प्रात्यक्षिक सांगून विषय मांडण्यात आला. कोष विषयाच्या अनुषंगाने ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र बेडेकर यांनी कोष व वित्तीय प्रबंधन या विषयावर मार्गदर्शन केले. यादरम्यान अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजीत गोखले यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. तीन दिवसाच्या या प्रशिक्षण शिबिराचा समारोप अखिल भारतीय महामंत्री आश्विन दळवी यांनी करताना संस्कार भारतीचा कार्यकर्ता संघटनेचा आधार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. संघटना आणि कार्यकर्ता यांच्या दरम्यान असणारे महत्त्वाचे बिंदू त्यांनी उपस्थित करून त्याची गरज सांगितली. अखिल भारतीय  राष्ट्रीय कला धरोहर प्रमुख ओजस हिराणी यांनी कला धरोहर या विभागाचे सादरीकरण करून उपस्थित त्यांना माहिती दिली. 22 व 23 रात्रीच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये पहिल्या दिवशी गोव्याच्या पारंपारिक कलावंतांनी गोव्याची पारंपरिक लोककला सादर केली व दुसऱ्या दिवशी रात्री संस्कार भारतीच्या विविध क्षेत्रातून आलेल्या कार्यकर्त्यांनी शास्त्रीय व सुगम संगीताचे गायन केले. या निमित्ताने गोव्याच्या अध्यक्ष डॉक्टर भूषण भावे, विवेक कवठेकर, उदय शेवडे पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे आदींनी तीन दिवस ही प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी योगदान दिले. 

अखिल भारतीय पातळीवर होणारे या संस्कार भारतीच्या प्रशिक्षण शिबिरासाठी देवगिरी प्रांतध्यक्षा प्रा. स्नेहलताई पाठक, कार्याध्यक्ष भगवान देशमुख, महामंत्री जगदीश देशमुख, कोषप्रमुख मोहन रावतोळे, सहकोषप्रमुख विधिज्ञ संजय घायाळ यांच्यासह देवगिरी प्रांतामधून 12 प्रतिनिधी उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यामधून देवगिरी प्रांत सह महामंत्री डॉ.सतीश महामुनी, प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ, पद्माकर मोकाशे, मार्तंड कुलकर्णी, सुनिता घाटे, गीता रावतोळे, प्रमोद वझे यांचा सहभाग होता.


 
Top