धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील कृषि महाविद्यालयात शनिवार दि.4 एप्रिल 2026 रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ICICI बँकेच्या वतीने कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील कृषि पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात संधी मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ICICI बँकेची प्रारंभिक ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण केलेले विद्यार्थीच मुलाखतीसाठी पात्र असणार आहेत. सकाळी 10 वाजता होणाऱ्या या प्लेसमेंटसाठी पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील,व्यवस्थापक प्रा.हरी घाडगे, कॅम्पस प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ.एम.आर.शेख,प्रा.सुमिथा पाटील,प्रा.नवनाथ मुंढे,डॉ.अमित गांधले,प्रा.महेश लोंढे,प्रा.रामचंद्र सुतार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम अथक परीश्रम घेत आहेत.