धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं.प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला. 

याबाबत अधिक माहिती देताना योगेश केदार म्हणाले, यावेळी जिल्ह्यातील साध्यस्थीतील राजकीय परिस्थिती संपर्क प्रमुखांनी विचारून घेतली. मागील जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेत सहभागी असल्याने मी त्यांना सर्व ती वस्तुस्थिती समजाऊन सांगितली. तिकीट वाटपावेळी झालेले वाद विवाद ते निवडणूक निकालानंतर पक्षात फूट पाडण्यासाठी झालेले प्रयत्न या सर्वांच्या बाबत त्यांना अवगत केले. तानाजीराव सावंत यांचे जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाढीसाठी मोठे महत्व आहे. त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. परत ते पक्ष वाढवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांच्या सक्रियतेमुळे शिवसैनिक आशावादी झाले आहेत. उमरगा लोहारा मतदारसंघात रवी सर तसेच ज्ञानराज चौगुले यांनी देखील त्यांचे गड मेहनतीने राखण्यासाठी प्रयत्न केले. कळंब धाराशिव मतदार संघात शिवसेना जनमानसात रुजलेली आहे. तिथे पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असले तरी ते सोडवता येण्यासारखे आहेत. ते झाल्यास हा मतदारसंघ ओके मधी शिवसेना राखेल. राहीला प्रश्न तुळजापूर शिवसेनेचा. तिथे मात्र विशेष लक्ष देऊन कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्षाची बांधणी आवश्यक आहे. या तालुक्यात सुद्धा मोठा स्कोप आहे. आम्ही या तालुक्यात प्रयत्न करत आहोत असे त्यांना सांगितले. बार्शी आणि औसा या लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या दोन ठिकांची त्रोटक माहिती दिली.

शिवसेना पक्षात एकी व्हावी यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न मीडियातून देखील दिसले आहेत. सामान्य शिवसैनिकांच्या मनातील खदखद ओळखून तुम्ही प्रसंगी आक्रमक भूमिका देखील घेतली. आपण आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात फिरू न अधिकची माहिती घेऊ. तसेच तेथील सर्व शिवसैनिकांना राजकीय ताकद देऊ असे त्यांनी सांगितले. आधी सुरुवातीला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे धाराशिवला जाऊ असे त्यांनी सांगितले.


 
Top