धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळपासून निसर्गाचा कोप पाहायला मिळाला आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत वीज पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने पुढील काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा वादळ, जोरदार वारा, पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी, ज्या भागात शेतीचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा आढावा घेऊन पुढील कायदेशीर आणि शासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल.
पुढील काही दिवस हवामान प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळावे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे. आपत्तीच्या स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी. अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटात सर्वांनी जागरूक राहून सुरक्षित रहावे असे आवाहन केले आहे.
- आमदार राणाजगजितसिंह पाटील
आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
धाराशिवतालुक्यातील बावी, धारूर या ठिकाणी दि. 21 एप्रिल रोजी झालेल्या गारपीटीने झालेल्या नुकसानीची आ. कैलास पाटील यांनी पहाणी केली. केळी, अंबा बागेचे प्रचंड नुकसान झाले असून बाधित शेतीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार कैलास पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
