भूम (प्रतिनिधी)- भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात कार्यक्रम पार पडला. समतानायक, क्रांतीसूर्य, विश्वगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसवेश्वरांच्या विचारांची आठवण यावेळी उपस्थितांनी जागवली.

कार्यक्रमाची सुरुवात उद्योजक महादेव मंनगिरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी बसवेश्वरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांचे कार्य स्मरले. या प्रसंगी अशोक तोडकर, डॉ. शिवशंकर खोले, प्रभाकर शेटे, मधुकर शेटे, ओम स्वामी, महादेव मंनगिरे, सिद्धेश्वर मनगिरे, अमित होळकर, पत्रकार धनंजय शेटे, बाजीराव बळे, उमेश मनगिरे, पंकज उंबरे, दत्ता शेद्रे, ऋषिकेश गवळी, भैया चौरे, गणेश रेवडवर, संजय होळकर, विजयकुमार सोलापूरे, श्रीकांत नकाते, राजेंद्र गाढवे वाशीकर यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बसवेश्वरांच्या विचारांचा समाजावर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित करण्यात आला. समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या शिकवणीचे आजही महत्त्व असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी बसवेश्वरांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प केला.


 
Top