तुळजापूर (प्रतिनिधी)- परंपरागत सत्कार पद्धतीला छेद देत “सत्कार शिक्षणासाठी” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार, अपसिंगा येथील सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता हार-फुले न देता वही, पेन, दप्तर यांसारखे शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ औपचारिकता नसून “शिक्षणाला दिलेली मोलाची साथ” असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. परंपरेप्रमाणे हार, फेटे, बुके आणि महागड्या शाली देण्याऐवजी शालेय साहित्य देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. सत्कारासाठी होणाऱ्या खर्चातून जमा होणारे साहित्य जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षण विभागामार्फत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. असून जिल्हाभरातील सत्कार सोहळे आता “ज्ञानयज्ञ” ठरू लागले आहेत.
